चार ओळी...
चार ओळी...
आज मनात आलं लिहाव्यात चार ओळी...
ज्या आल्या माझ्या ओठी...
कागद व पेन घेतलं मी हाती...
लिहित गेले भरभर त्या वेळी...
लिहिता लिहिता अश्रुचे थेंबही गळले पानावरती...
पुसटशा दिसू लागल्या मला लिहिलेल्या ओळी...
शब्दांना भिजवलेले होते का त्या अश्रुंनी...
पुढे लिहिण्यास सुरुवात करताना आले माझ्या ध्यानी...
पेनाची शाई संपली होती लिहिण्या आधीच
चूक नव्हती अश्रुंची होती बिन शाईच्या पेनाची...
मनातल्या त्या ओळी पुसटशा उतरल्या होत्या पानावरती...
मात्र गडद त्या ओळी राहिल्याच माझ्या मनी...
