चार एप्रिल
चार एप्रिल
 नवव्या दिवसाची सुप्रभात ही...!
न वं नवीन विचार मनात
व र वर उगाच पिंगा घालतात
व्या कुळ मनस्थितीत
दि वसागणिक भर टाकतात....
व सकन कोणीतरी
सा रखं अंगावर येतं वाटते
ची रफाड नित्य जीवनाची
सु ज्ञ पणे कोणीतरी करतं वाटते...
प्रसन्नतेत बाधा नसावी हे
भाग्यात असावे लागते
तरी पण मन सदोदित
ही च चिंता करीत असते....
आजचा दिवस सरला
आता उद्याचे काय...?
हाच प्रश्न घर करून राहतो
आणि पुन्हा उद्यासाठी दिवस उगवतो....
आज मात्र तसे झाले नाही
प्रसन्नतेत बाधा आली नाही
रविराजाचे दर्शन घेता
जीवनात न्यून काही उरले नाही....
प्रसन्न चित्ते दर्शन घेता
सारे क्लेश जळून खाक झाले
नवीन दिवसाचे नवे पान
सामोरी नटून सजून आले
