चाफा
चाफा
1 min
569
चाफा या फुलांच्या आहेत
अनेक प्रकारच्या जाती
चाफ्याच्या झाडाला
लागत नाही मुलायम माती
जुन्या देवळांच्या समोर
देवचाफा दिमाखात उभा असतो
देवळा बाहेरील भिकारी मनुष्याची
वाट बघत बसतो
चाफ्याच्या फुलांना असतो
सुवासिक सुगंध
त्या फुलांचे औषध बनवून
जोपासतो मी माझे छंद
चाफ्याच्या झाडाचे खडबडीत
असते खोड
त्याच्या फांदीलाच येतात
नवीन नवीन मोड
