STORYMIRROR

Murari Deshpande

Others

4  

Murari Deshpande

Others

चांद्रयान मोहीम - 2

चांद्रयान मोहीम - 2

1 min
197

शतक कराया पडली केवळ

एकच धाव कमी

म्हणुनी होतो निराश कधी का

जिगरबाज हो आम्ही


आज तोकडे असेल थोडे

पडलेले पाऊल

अभिनंदन चंद्राने केले

हीच यशाची चाहूल


स्वागतास मी भारत देशा

पसरीन माझे बाहू

नव्या दमाने पुन्हा एकदा

यान पाठवा पाहू


टाळून उणीवा झेप घेऊनी

यावे माझ्या घरी

पुष्पवृष्टी मी करीन तेथे

खूप तिरंग्यावरी


हिंदुस्थानी जिद्दीचा तर

मीही एक चाहता

चला करा बिनधास्त तयारी

कसली वाट पाहता


अंतराळही दूमदुमवू या रे

करू निनाद जयघोष

शास्त्रज्ञांनो तुमच्यामध्ये

भरपूर जिद्द नि जोश


नका मानू हे अपयश बिलकुल

कारण ना धक्क्याचे

मानकरी तुम्ही आजमितीला

नव्याण्णव टक्क्यांचे !


Rate this content
Log in