चांदोबा
चांदोबा
1 min
105
रात्रीच्या वेळेला
काळोख झाला
चांदोबा नभात
ऐटीत हा आला
चांदण्यांनी कसं
भरलं आकाश
काळोख सारुन
पसरला प्रकाश
रोज रोज बदलते
चंदामामाचे रुप
चंद्रकला पहायला
गंमत वाटे खूप
चांदोबा कधीतरी
खूप खूप रुसतो
काळ्याकुट्ट ढगात
जणू लपून बसतो
स्वप्नांच्या वाटेने मी
आकाशात येईन
चंदेरी या नगरीला
डोळेभरुन पाहीन
चांदोबा करशील ना
माझ्याशी तू दोस्ती
ढगाआड लपूछपू
करुया दोघे मस्ती!!!!
