चांदोबा आणि ससा
चांदोबा आणि ससा
1 min
159
इटुकला ससा
धावलाय असा
चित्याचाच छावा
शोभलाय जसा
धावता धावता
अशी मारे उडी
पायी अडकली
चांदोबाची कडी
काढता काढता
पायातील बेडी
थकून भागून
गेला पार गडी
चांदोबालाच आली
ससुल्याची पार दया
कुशीत घेऊन सशाला
लावली त्यानं माया
