STORYMIRROR

Padmakar Bhave

Others

3  

Padmakar Bhave

Others

चांदणं

चांदणं

1 min
225

एक सवाल

सारखा छळत असतो,

कोठून आणावेत तोडून शब्द

एखाद्या फुलासारखे...??

मिळतील तरी कुठे

शब्दांनी डवरलेल्या घनगर्द

डहाळ्या????

आणावेत का खुडून शब्द? प्राजक्तासारखे?


....असतील का तरंगत शब्द,

कुठल्या डोहाच्या नितळ जलावर???

पिंपळपानासारखे..??

भरता येतील का ओंजळीत?


.....क्षितिजाकडे पहात,

घालता येईल शब्दांना साद?


पहाता येईल का?

किंवा येईल का अनुभवता,

शब्दांनी गच्च भरलेलं आकाश???

चकोर चोचितून पीता येईल का शब्दांचं पुनव चांदणं??


वेड्या मनाच्या किती ह्या आर्त केका????

शब्दांच्या घननिल मेघांसाठी,

सापडतील का?येतील का वेचता ?

पावसाबरोबर येणारे शब्द?


...एक सवाल सारखा छळत असतो...!!


Rate this content
Log in