Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

चालू द्या

चालू द्या

1 min
11.6K

दातांचे झाले पत्रे

श्वासा गणिक हालती !

भाताची शीते ही

हीरड्यांना बोचती !

नजर झाली अंधूक

जवळ ना दूर कुणी !

हाक मारु म्हणता

कुंठीत होई वाणी !

हाडे ही खिळखिळी

पुढे चालेना पाऊल!

तरी का या काळजात

होते हो ऊलघाल ?

बोलती काय मला

काहीच समजेना !

दिल्यात जरी शिव्या

चीड कशी हो येईना !

कुडीचा हा पिंजरा

झालाय कमजोर

जीव फडफडे पण

झेप घेईना बाहेर !

सोडीन म्हणतो

पुन्हा तिथेच बसतो

संपता संपेना गोष्ट

कापूसकोंड्याची !

आस कोंडली कोंडली

आसमंत खुणावतो

आस जीवाला आस

कणा धरु पहातो !

रामरगाडा हा चाले

चाले तोवरी चालू द्या

आज नको पाहू उद्या

जीवाला या चालू द्या !

Rate this content
Log in