चाकरी
चाकरी
आयुष्यभर राबताना बाबांना पहिल, कधी नाही जाणवलं.
एक एक छदाम कष्टाने मिळविला, आता मी मानल.
ऐन तारुण्यात काळाची गरज, की पैशासाठी नोकरी धरली.
चुकलो कधी तरी पोटासाठी, मान थोडी खाली वाकली.
रोज नवीन अनुभवाचा प्रवास, काही वाईट काही चांगले.
मान अपमानाचे तागडे मात्र माझ्याशी, कधीच पक्षपाती नाही वागले.
अभिमान होता काबाड कष्टाचा, कमवत होतो जिद्दीच्या आवडीने.
वारसा दिला नाही तर शिकवला बाबांनी, जेव्हा सगळे नाव ठेवत होते सवडीने.
आधीही खूप हिणवायचे, आताही खूप हिणवतात माझ्या कामावर.
हेच ते लोक होते जे पैसे काय, शब्दही देत नव्हते माझ्या नावावर.
चाकरी गुलामी म्हणा की नोकरी, उरलेले सगळ काही शिकवूण जाते.
कष्ट केल्या शिवाय पैसा मिळत नाही, एवढी अक्कल नक्कीच येते.
