STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Others

3  

Tushar Chandrakant Mhatre

Others

चाकातल्या जगाला

चाकातल्या जगाला

1 min
11.5K

पिकवतात घर्ममोती

घडवतात अश्म रत्ने

त्यांच्याच जीवनात

दारिद्र्य भोग आला 


हातात पोट घेऊन

रक्त विकत होते

शहरात नरभक्षकांच्या

ठरवून घात झाला 


या तापल्या धरेचा

पायास दंश झाला

कित्येक गोतावळा

रस्त्यात खाक झाला 


का पायाला या भुईच्या

अाशा अजूनी नभाची

डोळ्यांतल्या जलाला

जहरी हर्ष झाला 


ही वाट स्वप्नातली

शोधे मृगजळाला 

चाकातल्या जगाला 

पंखांचा रंग आला 


Rate this content
Log in