STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

4  

Deepa Vankudre

Others

चाहूल

चाहूल

1 min
403

वसंताची चाहूल लागताच 

बहावा फुलतो वनात

भ्रमर गुंजारतो कमलदली 

प्रफुल्लता साठे मनात!


सुरवंटाचे होते फुलपाखरू 

मधुर पराग शोधत उडते 

बहर येतो तरु-लतांना,

किलबिल कानी पडते!


चांद येता रजनीसवे

रात चांदण्यात भिजते,

चाहूल सख्याच्या येण्याची,

लागता, रमणी लाजते


Rate this content
Log in