चाहूल वसंताची
चाहूल वसंताची
1 min
548
शिशिर ऋतूत
झोंबणारे वारे
शहारणारी थंडी
तनूस येती शहारे....
पानगळ झाली सुरू
दिसे फारच रूक्षता
फांदीवर दिसते
भयाण तिक्ष्णता.....
गोड चाहूल लागली
नवचैतन्याची, वसंताची
निसर्ग कवेत घेवून
गाणी गुणगुणण्याची...
गॅलरीमध्ये बसावे
कोकिळेचे गुंजन ऐकावे
वाफाळलेल्या चहासोबत
वर्तमानपत्र चाळावे....
पक्ष्यांचा किलबिलाट
चिऊताईचे अंगणी नाचणे
पारव्यांचे दाणे टिपणे
सृष्टीचे हे देणं सर्वाथाने जगणे...
सकाळची ही चाहूल
मनाला निर्भेळ आनंद देणारी
हा आनंद अनुभवण्यासाठी
निसर्गाच्या सान्निध्यात वसुधा रमणारी...
