STORYMIRROR

Smita Doshi

Others

4  

Smita Doshi

Others

चाहता क्रिकेट देश

चाहता क्रिकेट देश

1 min
177

सम्पूर्ण देश आहे चाहता क्रिकेटचा

क्रिकेटचं वेड लागलंय लहान-थोरांना

अहो,पण हे क्रिकेट घेईल एक दिवस माणसाची विकेट

सोडून कामधंदा युवा पाहतो क्रिकेट


रणांचा होईल चौकार-षटकार

पण घरात खायची कुठनं भाकार

मी नाही ऐकणार,म्हणतो युवा होऊन बेदरकार

वर्ल्ड कप मी पाहतच राहणार


अरे,पैसा, प्रसिद्धी मिळते क्रिकेटवीरांना

नुसती मॅच बघून नोकरी कोण देईल सांगाना

अलीकडे क्रिकेट झालंय अमाप

सारखा असतो कोणता ना कोणता कप


युवानो, वेळेचं,करियरचं महत्व जाणाना

सर्व कामं आटपून मॅच पहाना

तुमच्या च हाती तुमच्या भविष्याची दोरी

जी आहे तुमची आयुष्यभराची शिदोरी


जी घेईल तुमच्या आयुष्याची उंच भरारी

सांगाना क्रिकेट भारी की आयुष्य भारी

कशाची निवड करायची हे तुम्हीच ठरवा

आपलं आयुष्य आपणच घडवा----



Rate this content
Log in