चाचा नेहरू
चाचा नेहरू
१४ नोव्हेंबर १८८९ साली
भारतात एक सुपूत्र जन्मला
नाव त्यांचे पं. जवाहरलाल नेहरू
"बालदिन" म्हणतात या दिनाला.....
मुलांचे हे होते चाचा नेहरू
बाकीचे पंडित नेहरू म्हणायचे
सर्व जनतेचेच ते अती लाडाचे
मुलांचे ते खूप लाड करायचे....
"गुलाब" फूल त्यांना आवडायचे
मुले आणि फुले त्यांना फार प्यारे
भारतमातेचे लाडके सुपूत्र नेहरू
सारी जनता त्यांचे कौतुक करी.....
चाचा नेहरूंनी सदाेदीत पाहिले
स्वप्न नव्या कल्पनांचे, नव्या भारताचे
असे शिक्षण दिले लहान मुलांना
पूर्ण झाले भारतमातेच्या स्वातंत्र्याचे....
शांतीदूत याचा पाठ शिकवला
सार्या जगाला हा समजावला
भारताचा सन्मान वाढविला
असा थोर सुपूत्र भारताला लाभला...
वंदन करूया या महानतेला
सलाम करूया त्यांच्या कर्तृत्वाला....
