STORYMIRROR

RAVINDRA DALVI

Others

3  

RAVINDRA DALVI

Others

बुवाबाजी (अभंग )

बुवाबाजी (अभंग )

1 min
302

विवंचित मन    

आधार शोधते

बुवांचे फावते   

आपसूक


दिसता सावज 

टाकतात डेरा

घालतात घेरा   

गुरमीतं


मुखातुनी जपे

सदा राम राम

रावणाचे काम 

आसाराम


अंगारे धुपारे

व्यर्थ सारे खेळ

जमवूनि मेळ

खेळविती


बुवा सांगे ज्ञान  

उगाळूनी तसे

शिकवीले जसे 

पोपटच


अध्यात्माची गोळी

डोक्यातं भिनते

अंगातं चढते

देव देव


ह्वेतुनी काढी

अंगठी अंगारा

वाढवी पसारा 

प्रयोगाचा


गुरु ग्रह दशा

जोडूनिया देती

मरणाची भिती  

कुंडलीतं


सत्संगाच्या नावे

बाजार मांडती

विक्रीस ठेवती  

गंडेदोरे


श्रद्धेला जडती 

कर्मकांड स्तोम

अंधश्रद्धा मग  

फोफावते


दिसत घबाड 

बाबा फेकी जाळे

किती तरी वाडे

झालेध्वस्त


बुवा संगे बाया

धोक्याचीच घंटा

होतो तिथे तंटा 

निश्चितच


खादीधारी गर्दी  

बुवा मागे धावे

आश्रमाचे दावे  

निकालात


कुणीच नसतो 

इतका महान

टाकावी गहान

बुद्धीतेथे


मानवाचे हाती 

असे फक्त कर्म

हाच खरा धर्म

युगायुगे


आता तरी पाळा

मानवाचा धर्म

हेची खरे मर्म 

कल्याणाचे 



Rate this content
Log in