बस
बस
बसचा प्रवास असतो खास...
गच्च भरलेल्या माणसांचा सहवास...
गजबजलेला निरनिराळा आवाज...
अनोळखी ओळखी चेहऱ्याचा आभास...
खिडकीजवळ सीट मिळावी हा ज्याचा त्याचा अट्टहास...
खिडकीतून बाहेर डोकवण्यात मज्जा येते फार...
उभे असलेले सीट रिकामी मिळते का याची पाहतात वाट
कंडक्टर दादाचा रुबाब भारी...
आपल्या खास शैलीत प्रवासात रंगत आणि...
त्याच्या एका शिटीवर बस थांबते...
हुकूम देताच परत सुरु होते...
बसच्या प्रवासात मिळतात किती तरी थांबे...
आणि काही नागमोडी वळणे...
कोणी नसतं ओळखी त्या प्रवासात...
हळूहळू ओळखीने होते गप्पांची सुरुवात...
सुख-दुःखाची होते देवाणघेवाण...
प्रवास संपेपर्यंत अनोळखी व्यक्ती वाटते ओळखीची...
बसचा प्रवास माणसे जोडतो...
त्यात गरीब-श्रीमंत एकाच सीटवर सफर करतो...
