बस इतकच ! ©®
बस इतकच ! ©®
अनादी अनंत काळा पासून आणि अगदी आजही,
ते सारे आहेतच मुक्त नेहमी....
बंधनात मात्र सदैव ठेवल्या होत्या अडकवून त्या आणि मी.....
बस इतकच !
काळ बदलला तशा आज,
त्याही होतात मोकळ्या..
देण्यासाठी त्यांच्यातल्या कलेला अन प्रतिभेला वाव....
पण नेमका तेंव्हाच घिरट्या घालत जमा होतो भोवती त्यांच्या सारा गाव....
बस इतकच !
काही रिकामटेकडे ते;
लागतात मग कामाला भराभर....
पाठवतात तिला फेसबुक वर रिक्वेस्ट अन भरून टाकतात तिच मेसेंजर....
बस इतकच !
मागतात काही फ़ोन नंबर,
तर काही लगेच धडकतात पाठोपाठ वॉट्सएप्प वर....
ती बावरते, बिचकते
कधी घाबरून थांबते;
पण त्या देतात तिची सदैव साथ...
एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची
पाठराखी मैत्रिण बनत
येतात त्या एकत्र आणि घट्ट धरतात एकमेकींचे हाथ...
बस इतकच !
सुरु होतो मग त्यांचा नवा प्रवास
मैत्री सोबत- बहारदार लिखाणाचा..
म्हणूनच नको वाटतो त्यांना अडथळा...
दर सेकंदाला वाजणाऱ्या त्या वायफळ गप्पांनी भरलेल्या मैसेंजरचा....
बस इतकच !
घर, दार आणि व्यवसाय
असो वा नोकरी ...
सगळ्याच आघाड्या सांभाळत;
त्या हे लिखाणाचे क्षेत्रही गाजवतात...
अन गरज पडलीच जर कधी,
तर काहींना फेसबुक वर ब्लॉक करुन निमूटपणे त्यांच्या काना खालीही वाजवतात...
बस इतकच !
त्या होऊ पाहतात
व्यक्त शब्दांमधून ...
आणि आभार मानतात वाचकांचे
नेहमी अगदी मनापासून...
बस इतकच !
खरे वाचक करतात सन्मान त्यांच्या लिखाणाचा;
देवून भरघोस दाद आणि दाखवत
खरी भक्ती ....
समजून घेत नेहमी की
लिहिणारी 'ही', 'ती', 'हया' आणि 'त्या' ही
साऱ्या आहेत एक व्यक्ती....
बस इतकच!
जाणून घेतात सुजाण वाचक की लिहिणाऱ्या प्रत्येकीला;
आहे तिच स्वत:च
एक विश्व .....
समजून घेत,
ताबा ठेवत स्वत:च्या मनावर,
बांधतात ते दौडणारे स्वैर अश्व ....
बस इतकच !
ऋणात तुम्हा वाचकांच्या
असतील त्या कायम ...
अन वाकड्या वळणांनी येवू पाहणाऱ्यांना भरतील
नेहमीच आता यापुढे दम....
बस इतकच!
