बरसल्या धारा
बरसल्या धारा
1 min
528
अवचित आज
सुटे गार वारा
अंगणात माझ्या
बरसल्या धारा
नभ झाले गोळा
अंधारल्या दिशा
चमकता वीज
उजळते निशा
जीवनात आशा
आली बहरून
क्षण तो सुगंधी
गेला मोहरून
झाड हाले डुले
सैरभैर पक्षी
लपे क्षणार्धात
कोण तया रक्षी
जीवनाचे गाणे
असे गात जावे
सृष्टीसाठी नित्य
पावसाने यावे