बरसला पाऊस खट्याळ...
बरसला पाऊस खट्याळ...
1 min
231
वलय पसरतात पाण्यावरती,
गर्जता बिजली आकाशी
उफाळून येतील जलधारा सुखाशी,
बरसला पाऊस खट्याळ धरेशी ...
शिवाशिवी करतो वाऱ्याशी,
ओजंळीत ठिबकतो बोटांशी
ओलावा शिंपीत मनाशी,
बरसला पाऊस खट्याळ उराशी ...
सागरात शोधी खोली,
अथांगाला थांग नाही
कोणी सांगेल वेड्या मनी,
बरसला पाऊस खट्याळ अंगणी ...
गुंज पावसाचे बोले मनी,
सख्या सामावून घे नयनातुनी
अलगद वेच आठवणी चिंतूनी,
बरसला पाऊस खट्याळ जीवनी ...
