बरसात जलधारांची
बरसात जलधारांची


*बरसात जलधारांची*
जल थेंबाने चमकते सृष्टी ही बावरी
कधी लाजऱ्या आणि कधी हासऱ्या
आल्या माझ्या अंगणी या श्रावणसरी....
श्रावणातल्या धुंद जलधारानी
वसुंधरा ही चिंब चिंब भिजली
नव्या पिकांना नव उभारी आली...
इंद्रधनुष्याचा खेळ चाले आकाशी
मन सारखे माझे तो वेधून घेई
मी त्या सप्तरंगात नाहून घेई...
श्रावणातला या मस्त गारव्याने
मला मिळते थंड,थंडाई, थंडाई
पक्षी आनंदाने गगनी गाणी गाई....
तहानलेली, तप्त झालेली वसुंधरा
पावसाच्या जलधाराने तृप्त होई
जलथेंबाने पसरते सगळीकडे हिरवाई...
नील जलधारांची अनोखी बरसात
या श्रावण सरी धरेवर करतात
वरील सर्वसृष्टीला आनंद देतात...
वसुधा वैभव नाईक, पुणे
मो. नं. 9823582116