STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

ब्रह्मांड....!

ब्रह्मांड....!

1 min
135

जुन्या पद्धतीची लेखणी आमची

नवनवीन शिकायला लावते

ब्रम्हांड चे ब्रह्मांड लिहायचे असते

हे ठासून ठासून सांगते....

काही काही गोष्टी

घोटवूनच घ्याव्या लागतात

अशा वेळी पूर्वीच्या कित्त्याची

आठवण आवर्जून करून देतात....

कानाखाली जाळ निघायचा

तेंव्हा ब्रम्हांड एकवटुन यायचे

काजवे चमकावे तसे

दिवसाच तारे चमकायचे...

असे अनेक वेळेला झाले

त्यामुळे ब्रम्हांड चांगलेच बसले

पण आता ब्रम्हांड नसून ते

ब्रह्मांड आहे हे चांगलेच ठसले....

योग्य अयोग्यच्या फंदात

कधी मला पडावे वाटत नाही

तरीपण ब्रह्मांडाची जाण मात्र

उरी झाल्यावाचून रहात नाही...

जेजे चांगले ते ते सारे

माझ्या छोट्या ब्रह्मांडात आहे

सारे ज्ञानजीवनच जणू माझे

एक छोट्या खंडात कैद आहे....!



Rate this content
Log in