STORYMIRROR

Murari Deshpande

Others

4  

Murari Deshpande

Others

बोटावरली मतदानाची...

बोटावरली मतदानाची...

1 min
194

बोटावरली मतदानाची

अजून शाई सुकली नाही

आम्हीच गाढव ठरलो कारण

मते कधीही विकली नाही


झगडतील ते लाजिरवाणे

असे वाटले नव्हते बिलकुल

दोस्ती त्यांची निवडणुकीतील

'निकाल' पाहून टिकली नाही


मुख्यमंत्री तर एकच आता

वाटप निम्मे कसे करावे

हसली 'वर्षा' आणि म्हणाली

'पोरे' काही शिकली नाही


बिनपैशांचा मस्त तमाशा

कलाकार कसलेले दिसती

रोजच कुंकू कुणी बदलतो

शिल्लक आता 'टिकली' नाही


दान करावे सत्पात्रांना

आठवते पूर्वीची म्हण

भानगडीच्या बाजारी या

भली मंडळी टिकली नाही


कोणाहाती राज्य असावे

ब्रेकिंग न्यूजचा मारा चालू

मुलाखती फिक्सिंग भासती

कोण वाहिनी विकली नाही?


सरकारेही खूप पाहिली

कडू गोड अनुभवले सारे

राज्य स्थापनेपासून इतकी

कधीच डोकी पिकली नाही


Rate this content
Log in