STORYMIRROR

Umesh Salunke

Others

4  

Umesh Salunke

Others

बोलणं असावं न विसरणारं...

बोलणं असावं न विसरणारं...

1 min
311

बोलणं असावं न विसरणारं

भेटला तर स्मितहास्य करणारं

आठवणींच्या त्या घालवलेल्या

क्षणाला उजाळा देणारं.....!


बोलणं करावं पोरकं न होणारं

जिव्हारी लागून मनाला न पटणारं

आपुलकी निर्माण करावी नातं विणणार.....!


बोलणं करावं घरच्या रस्त्याने जाताना

पायाखालच्या जमिनीला कळून चुकावं

आज कुणाचं पावलाच ओझं गेलं नसावं

कुणीतरी हाक मारावं. त्याच्यासोबत दोन

शब्द गोड बोलावं. आपल्या माघारी कुणीतरी सांगावं.....!


किती दिवसाच आपलं आयुष्य असावं

कधी कुणाच्या सोबत फ़िरलेलं असावं

कधी कुणाच्या सोबत चर्चेत असलेलं दिसावं

कधी कुणाच्या हितगूज केलेलं ते कायम

लक्ष वेधून घेणार असावं.....!


 कुणाच्या बोलण्यावरून खतपाणी घालून

 विष कालवून आपल्याच नात्यात गालबोट

 लागणार नसावं.आपलीच रक्ताची नाती टिकून

 रहावं इतकीच अपेक्षा आजच्या तरुण पिढीने करावं.....!


Rate this content
Log in