बोललो नेमके ते कडू लागले
बोललो नेमके ते कडू लागले
1 min
7.1K
बोललो नेमके ते कडू लागले
जीवनी चूक आता घडू लागले
चूर झाला मनाचा असा आरसा
काच खोलीत खाली पडू लागले
ऐकता बोल आला शहारा मला
घाव माझे सुखाला नडू लागले
टोचले वेदनेचे मला बोलणे
आसवे गाळुनी मी रडू लागले
ही 'उमा' सांगते हो कहाणी तिची
नाव ओठी तुझे सापडू लागले