STORYMIRROR

Vinita Kadam

Others

3  

Vinita Kadam

Others

बोल मराठी

बोल मराठी

1 min
384

मराठी माय

दुधाची साय

माझी मराठी

रसाळ हाय......१


ज्ञान सावली

विठू माऊली

असंख्य संग

चाले पाऊली.....२


अभंगवाणी 

अमृतवाणी

बोल मराठी

सुंदर वाणी.....३


भाषा साजिरी

आहे गोजिरी

टाळ मराठी

वाजे मंजिरी.....४


शब्द जपले

गूज कळले

वर्ण मराठी

मनी वळले.....५


तुझ्या कलांचे

दार सुखांचे

जग पोवाडे

गाई शुरांचे.....६


वर्ष मराठी

हर्ष मराठी

माणूसपण

सण मराठी.....७


यमक छंद

हा काव्यानंद

प्रीत मराठी

आनंदकंद.....८


ही पंचाक्षरी काव्यरचना आहे...यामध्ये प्रत्येक ओळ ही पाच अक्षरांची आहे. तसेच दुसऱ्या आणि चौथ्या ओळीचे स्वरयमक जुळणे महत्त्वाचे अशी ही पंचाक्षरी आहे.


Rate this content
Log in