बोल अनुभवाचे
बोल अनुभवाचे
1 min
244
मी जन्माला येताना
सर्वांना आंनद झाला
झाल्या आईस यातना
बाबा पेढे वाटे जनाला
............
पाचवीची पूजा केली
सटवाई पूढे मांडले मला
चांगलं कपाळावर लिहा
सुखी ठेव माझ्या बाळाला
..............
बाळोते ओले होता
रडू येई फार मला
घरातील मंडळी म्हणे
भूक लागली छकुल्याला
