बोक्या दादा
बोक्या दादा
1 min
10
बोक्या दादा,बोक्या दादा काय करतोस
मनी माऊला तू का त्रास देतोस...
गप बस बोक्या दूध छान पिऊ दे
तुला तुझं दिलय ते दूध पिऊन घे...
बघ बोक्या आई आली, आई आली
आईचे नाव काढताच बोक्याने धूम ठोकली...
बोक्याला कोपऱ्यात उंदीरमामा दिसला
उंदीरमामा त्याला पाहताच पसार झाला...
बोक्या दादाने अंगणात चक्कर मारली
बोक्याचा शोध घेत मनी पण आली...
दोघेही आता लागले छान खेळायला
झाडांच्या मागे लागले लपायला...