STORYMIRROR

Yogita Takatrao

Others

4  

Yogita Takatrao

Others

बंदिस्त

बंदिस्त

1 min
94

कसला दबाव

छळतो मनात 

राहते का नारी? 

नित तणावात !


मनाचा तो बांध 

तोड ना हा पाश

हो गं भयमुक्ता

ना हो स्वत्व नाश !


मन प्रफुल्लित 

ठेवू या गं सखी

आरोग्य राखून

होऊ या ना सुखी !


रहा तू प्रसन्न 

घे परमानंद  

घेऊन भरारी

मिळेल स्वानंद !


नकोच बंदिस्त 

जीवन स्विकारू 

कार्य ने सिद्धीस 

हो फुलपाखरू !


Rate this content
Log in