बंदिस्त हे जग सारे
बंदिस्त हे जग सारे
कसे गाफील राहून सर्वच होते आयुष्यात व्यस्त
कोणास होते ठाऊक, एक विषाणू घालेल अशी गस्त
कोरोनाच्या प्रादुर्भावात अडकले आहे हे जग
मोकळा श्वास घेण्यासाठी होतेय जिवाची तगमग
तसा सर्वांनाच हवा असतो रूटीनमधून ब्रेक
आता ब्रेकच इतका लांबलाय की त्यातूनही मिळावा वाटतोय ब्रेक
आता मानवाच्या चेहऱ्यावर चढलाय मास्क
नि निसर्ग घेतोय मोकळा श्वास
वाहनांच्या हॉर्नऐवजी ऐकू येतो पक्ष्यांचा किलबिलाट
सुरूवातीला नव्हते गांभीर्य, पण आता वाढतोय संयम
आधीची जीवनशैली आठवत, प्रत्येकजण पाळू लागलाय नियम
न दिसणाऱ्या या शत्रुने संकट जगावर आणले
धैर्याने एकजुटीने याच्याशी आता लढायला हवे
समाजातील खऱ्या हिरोंचीही ओळख आता पटलीये
त्यांच्यासमोर नतमस्तक होऊ हीच भावना आता मनी उरलीये
सगळंच एकदम थांबलंय पण वेळ काही थांबली नाही
माणसाला सुधारण्याची संधी सृष्टीने यापूर्वी कधीच दिली नाही
