बंधु प्रेम
बंधु प्रेम
1 min
64
मान देवमाणसाचा नाते सोज्वळ प्रेमाचे, ज्येष्ठ बंधू आदराचा, बंध अतूट जन्माचे!
खेळ लहानपणीचे, कधी दंगा, कधी मस्ती, कधी रुसवा, फुगवा, कधी अबोल्याची धास्ती!
मुक्त जेव्हा बालपण, बागडलो, खिदळलो येता निरोप घटिका, मूक आसवे गाळलो
झंझावते आली किती, साथ सदैव राहिली, धुरा राखीच्या धाग्याची, त्याने नेहमी वाहिली!
माता-पिता, बंधु-सखा, दादा माझा जिव्हाळ्याचा, पुण्य कर्माचे सुफळ, भाऊ मिळाला भाग्याचा!