STORYMIRROR

Pratibha Bilgi

Others

4  

Pratibha Bilgi

Others

बंधन

बंधन

1 min
531

तू आणि मी, हा खयालच किती सुंदर आहे

निज होण्यास हे विचार, जवळीकही जरूरी आहे


मिलन जे अधूरे, पूर्ण करण्याची वेळ आहे

पावसात चिंब भिजून, एकरूप व्हायचं स्वप्न आहे


तुझाच अन् तुझाच, प्रत्येक क्षणी ध्यास आहे

तुझ्या पुढे असं वाटतं, पूर्ण विश्व फिकं आहे


गंध या मातीचा सुगंधी, आपल्याही नात्यात आहे

अशा या बंधाला, बंधन ही सारखे सतत आहे


तोडून सगळे पाश, तुझ्या जवळ मी आली आहे 

स्वीकार अथवा नाकार, शेवटी निर्णय तुझाच आहे


Rate this content
Log in