STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

बंध मुक्त (सहाक्षरी)

बंध मुक्त (सहाक्षरी)

1 min
11.5K

मोकळे आकाश

मिळे आज तुला

चल तोड साऱ्या

आता त्या श्रृंखला


हवे तेच कर

नसावा लगाम 

स्वैर नको तरी

व्हावे न गुलाम


पंख नवे भेटे

घेण्यास भरारी

नव्या विचारांची 

फुंकावी तुतारी


बंध मुक्त होता

श्वास तो नवाच

चाकोरी बाहेर

जगा एकदाच


Rate this content
Log in