STORYMIRROR

vanita shinde

Others

4  

vanita shinde

Others

बंड्या दादा

बंड्या दादा

1 min
478

बंड्या दादाची गंमत न्यारी

पाहायला मग जमायची सारी,

लाडू सारखे पोट गोल गोल

वाजवायचा तो समजून ढोल.


चाल त्याची भोपळ्यापरी

टुणूक टुणूक उड्या मारी,

बिनकामी बंड्या दारोदारी

थापा ठोकत फिरायचा भारी.


खादाड खाऊ बंड्या दादा

एकदम सारे करायचा फस्त,

तुडूम पोटावर फिरवत हात

म्हणायचा जेवण खुपच मस्त.


बसेल तिथेच खायचा डुलकी

पोरं त्याची घ्यायची फिरकी,

घोरायचा रोज डराव डराव

वाटायचे जणू ओरडते बेडकी.


लहान मुलांशी खेळताना एकदा

बंड्या दादा धपकन पडला,

मुलांनी त्याची गंमत करता

कोपऱ्यात जाऊन मुळूमुळू रडला


Rate this content
Log in