बंद शाळा, उरल्या भिंती
बंद शाळा, उरल्या भिंती
1 min
227
शाळेची घंटा झाली बंद
आवाज शोधते शाळा,
बंद सारे हसणे खिदळणे
अनुभव हा खूपच वेगळा...!!१!!
शांत सारे वर्गखोल्या
धूळ चढली बाकांवर,
फळा कोरा करकरीत
खेळ नाही मैदानावर...!!२!!
ती रोजची बाराखडी
मोठ्या ने म्हणणारे पाढे,
स्पर्धा आज कुठेच नाही
ना कुठे कोणी धडपडे...!!३!!
ताला सुरातली शिस्त
खरंच कधी होईल सुरु?
शिक्षक झाले दुःखी सारे
म्हणे शाळा सुरू करू...!!४!!
घेऊ काळजी मुलांची
अंगास वळण लावूनी,
बघवेना शाळेची अवस्था
डोळ्यात साठले पाणी...!!५!!
साद ऐका, या मुलांनो
शाळा रडू लागल्या.....
तुमच्याशिवाय आज
नुसत्याच भिंती राहिल्या...!!६!!
