बळीराजाची लेकरे
बळीराजाची लेकरे
1 min
345
बळीराजाची लेकरे
------------------------
रामप्रहरी शेणकुर करी
चारा वैरण गुरांना चारी।
मायेने अंगावर हात फिरवी
बळीराजा, माझा बाप शेतकरी।।
लेकराने शिकून मोठे व्हावे
खूप वाटे अंतरी त्याला।
न देई हात लावू
कुठल्याही कामाला।।
जुंपून बैलगाडी
जातो तो शेतावरी।
बांदा बांदा मधूनी
तो शेत नांगरी।।
वेळेवर करुनि पेरणी
कष्ट करी सांज सकाळ।
येई पीक डोक्याएव्हढे
खुश होई पाहुनी निळे आभाळ।।
आम्ही बळीराजाची लेकरे
आमच्यासाठी जुंपून घेई कामाला।
जरी पावसाअभावी पीक जळे
दोष देई तो नशिबाला।।
