बळीराजा
बळीराजा
1 min
174
हिरव्या पानांत गूज कानात
सांगून गेलाय खट्याळ वारा
येणार पुन्हा उडविण्या धुराळा
पसरलाय जो शिवारी पसारा
शेतात हिरवागार जोंधळा
शोभून दिसतो कणसाचा तुरा
कणसात पिवळे दाणे टपोरे
दाण्यावरती भिळल्या नजरा
सकाळ होता पाखरांची किलबिल
बेत आखती दाणा टिपण्याचा
नजरेत भरला पिवळा दाणा
थवा निघाला शिवारात पाखरांचा
वाऱ्याची झुळूक येता हळुवार
डोले वाऱ्यावर खुशीत जोंधळा
मन मोहून टाकते शेतकऱ्यांचे
दिसतो शोभून शिवार पिवळा
येताच दिवस सुगीचे
चोहीकडे आनंदी आनंद
माऱ्यावर उभा बळीराजा
गोफण फिरवी होवून धुंद
