बळी पिकवितो मोती
बळी पिकवितो मोती
1 min
302
येतो खाली मेघराजा
भेटायला धरणीला,
वाट त्याची पाहे बळी
टक लावून नभाला
घाम गाळूनी जोमाने
फुलवितो काळी माती,
राब राबूनी कष्टाने
बळी पिकवितो मोती
बहरते शिवारात
पिक ऐटीत तोऱ्याने,
झुंजूमुंजू गाणे गात
डोलू लागते वाऱ्याने
डोलणारे पिक जणू
भासे मोत्यासम त्याला,
डोळे भरुन हर्षाने
अश्रू लागे वाहायला
साऱ्या जगाचा पोशिंदा
नसे चैन क्षणभर,
आस एकच मनात
घास मिळो पोटभर
