बीजली
बीजली

1 min

41
ती चिमुकली बीजली
नंदा घरुनी आली
कारागृही देवकीच्या कुशीत !
नगर सारे होते नीजलेले
पण कंस होता जागत !
आला तरातरा
वदला कुठे तो छोकरा ?
पाहूनी चिमुकली
हसला आनंदात !
तरी ओढले तिला
फिरवली गरगरा
गेली निसटून
भविष्य सांगून !