बीजाचा प्रवास
बीजाचा प्रवास
1 min
401
ऐक ऐक
माझ्या मुला
सांगते मी
कथा तुला.
'एक होते
छोटे बीज
आली त्यास
खूप नीज.
हळू गेले
मातीमंदी
धरणीच्या
कुशीमंदी.
तिथे होते
ऊब,पाणी
धरा गाई
गोड गाणी.
सरले ना
दिस चार
बीज झाले
मोठे फार.
सुरु झाली
गडबड
वर येण्या
धडपड.
वर येता
झाले दंग
पालटले
रूप, रंग.
हरा हरा
रंग छान
रोपट्याचा
मिळे मान.
रोप झाले
खुश अति
बहरली
पर्णपाती.
वर्षाराणी
जोजविते
रोपट्याला
मोहविते.
रोपट्याची
झाली वाढ
आकारले
मोठे झाड.
फळ ,फूल
आणि छाया
वृक्ष करी
सदा माया.
पक्षी आले
घरट्यात
वृक्षरुपी
रोपट्यात.
धन्य झाले
बीज, वृक्ष
मिळे जणू
स्वर्ग ,मोक्ष'.
