STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

बीज अंकुरे अंकुरे

बीज अंकुरे अंकुरे

1 min
245

बीज अंकुरे अंकुरे, बघ कुशीत आईच्या,

फुटे पालवी मनाला,दाटे भावना हर्षाच्या.


बीज प्रेमाचा अंकुर,माय घालते फुंकर,

झरा वाहता मायेचा,बाळ देतसे हुंकार.


बीज अंकुरे अंकुरे,येई कोंब मातीतूनी,

रूजे बियाणे शेतात,ऊब देतसे धरणी.


बीज करी धडपड,येई वाढीस जोमानी,

येता बहरास कसे,डोले वाऱ्यासवे रानी. 


होई अंकुराचे झाड,वाढे बघा ताडमाड,

देई जगाला सावली,जपा तया जीवापाड.


साहित्याला गुण द्या
लॉग इन