STORYMIRROR

Madhuri Dashpute

Others

4  

Madhuri Dashpute

Others

भयसूर

भयसूर

1 min
186

आहेस ना देवा तू की

हरवला आहेस कुठे?

कवाडे ही बंद तुझी

तूला शोधायचं तरी कुठे?!

पण तू तर म्हणे चराचरात

इतरत्र आणि सर्वत्र

कसा निर्धावलायस तरी

पाहून पाणावलेले नेत्र!

तू तर म्हणे जळी,स्थळी

काष्टी आणि पाषानी

तरीही कसे तूझ्या राज्यात

आज सारेच असमाधानी!

मंदिरे बंद तुझी तरी

झाली नाही भक्ती कमी

दिवसरात्र तरीही तूला

पूजतोय अरे आम्ही!

तूझ्या अस्तित्वाचा आता

तूच दे पुरावा

नाहीतर तुझ्यात अन आमच्यात

येईल खूप दुरावा!

घडू दे आता दर्शन

तुझ्यातल्या शक्तीचं

मिळू दे आता फळ

आम्ही केलेल्या भक्तीचं!

संकटाला या दूर सार

दाखव तुझी शक्ती

मिळू दे आम्हा सर्वांना

या कोरोना च्या भेसुरापासून मुक्ती!


Rate this content
Log in