STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

1  

Meenakshi Kilawat

Others

भयरस कविता

भयरस कविता

1 min
2.4K


रात्र होती अमावस्येची

काय सांगु मी आपबिती

पाहताच राहिले उभे

अंगावरी रोमांच अती।।


घरी कोणी ही नव्हते

झोपेत होती मी एकटे

आवाज येई चहूदिशी

खिडकीची हालती पटे।।


काही उमजण्या आधी

कुदले घरात कोणीतरी

पांघरूण जरासे सरकले

अंगाला सुटली थरथरी ।।


मनी उठले अनाहूत काहूर

कशी होती ती भयानक रात

नव्हते जराही त्राण शरीरात

सुन्न झाले हातपाय जसा वात।।


नाकामध्ये कोंदट आला वास

सो सो चा कानावरी आवाज

थंडीतही घाबरून सुटला घाम

उठण्याचा केला प्रयत्न वाद ।।


जवळच दिसले दोन डोळे

घाबरून पांघरूण मी फेकली

कसेतरी लाईट सर्वेच लाविले

तोच मांजर उडी मारून पळाली ।।


बघून मी खूप हासली

दिवस राहिला आठवणी

दुसऱ्या दिवशी सांगितली रातकथा

साऱ्यांचे पोट दुखाया लागले ऐकुनी ।।


Rate this content
Log in