भयमुक्त
भयमुक्त
1 min
256
ना अंधाराचे भय वाटे
नाही या निर्दयी समाजाचे मला
भय वाटते बुरसट विचारांचे
ज्याच्याशी लढते मी रोज लढा
जीवन हे गुंतागुंतीचे
किती सोडवल्या समस्या
पुन्हा भयाचे विणते जाळे
जळमटे मनावरही व्यापल्या
ही जळमटे दूर करणे
ना शक्य होई मजला
तो धीर ना गोळा होत असे
काय करावे असा प्रश्न पडला
का मन माझे महत्व देते
अनावश्यक बोचट विचारांना
सर्व चिंता दूर सारून व्हावे
वाटते राहू भयमुक्त आता
