भ्याड अमानुष हल्ला
भ्याड अमानुष हल्ला
ऐकून भ्याड हल्ल्याची बातमी
काटा सरसरला हो अंगावरती
आतंकवादाचा पुन्हा धुमाकूळ
का कमी पडली सैनिकांची कीर्ती
रोखून बंदुका जवान सीमेवरती
जागता कडक पहाराच तो देतो
कुठून अचानक बॉम्बच्या गाडीचा
धक्का जवानांच्या व्हॅनला लागतो
निष्पाप सैनिकांचे कित्येक कलेवर
पाहूनी डोळ्यांतून अश्रूच ओघळले
किती कुटुंबे आणि सारीच घरेदारे
भळभळणाऱ्या जखमांनी चिघळले
तिरंग्यातले कितीतरी निर्जीव देह
अतृप्त राहिले लढण्या न्यायासाठी
गिधाडांनी करूनी तो भ्याड हल्ला
हकनाक लाचार केले प्राणांसाठी
चोरी छुप्या त्या बेसावध हल्ल्यानं
केले शूरवीर जवानांच्यावरती वार
कुठे फेडतील अधम पापाची फळे
बंद त्यांच्यासाठी नरकाचेही दार
