भय
भय
मनातील कुठल्या तरी कप्प्यात
बसलेलं असतं भय
एकांतात पिशाच्च बनून
प्रकट होत असते भय
बालपणी मनावर बिंबले असते भय
अंतर्मनात खोलवर रुजले असते भय
कधी काळोखाची भीती तर
कधी अनोळखी लोकांची भिती
आत्मविश्वासाची कमी असते भय
अंधश्रधेला खतपाणी असते भय
अज्ञानाची खोल दरी आहे भय
कमजोर मनाचं प्रतिबिंब आहे भय
अदृश्य भीतीचा गोळा आहे भय
अनामिक भीतीने अंगावर काटा येतो
असुरक्षिततेची भावना निर्माण करते भय
मनात बसलेल्या आजाराला विळखा घालतं भय
सतत घडणार्या अनाकलनिय घटना
अनाठायी भीतीचे साठवण करते
अघटित घडणार्या घटनानां करुन
एकत्रित भयाची प्रतिमा तयार करते
असू द्या विज्ञानाची साथ
तर जाईल अंधाराची भीती आणी
अंधविश्वासाची कात
आत्मविश्वासाने मनाला बळ द्या
निरंतर प्रगतीची वाटचाल करु या
