STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

भय

भय

1 min
164

भय दुनियेमधले

ना कधीच संपणारे

बा मनुजा सावध हो

जग तू शहाणपणाने


भय वाटे बालपणी

राक्षस नि चेटकिणींचे

वय वाढता कळाले

ते जग काल्पनिक होते


भय पावलोपावली

पाऊल बाहेर पडता

कुणी चालक धक्का मारी

पडे कुणी चालताचालता


मुक्या कळ्या बसमधी

ना सुरक्षित तरीही

कुणी पळवी त्यांना

अन् मागे खंडणी


आता ना सुरक्षित

घरातही असता

कुणी भामटा शिरे

अन् मारे पैशाकरिता


खरे निर्भय आयुष्य

होते रामराज्यामधी

वाट पाहती जन सारे

रामराज्य येईल कधी ?


साहित्याला गुण द्या
लॉग इन