भय
भय
भय इथले संपत नाही
महापुराचे भय, भूकम्पाचे भय
महागाईचे भय, भ्र ष्टाचाराचे भय
घरातून बाहेर पडले की काय घडेल याचे भय
स्त्रीला अ सुरक्षिततेचे भय
स्त्री गर्भाला गर्भपाताचे भय
शेतकऱ्याला कर्जाचे भय
खासदाराला सत्तेचं,खुर्चीच भय
भय भय भय
कोण आहे इथे निर्भय?
पर्यावरणाला प्रदूषणाचं भय
गरिबाला कुपोषणाचं भय
परदेशातील भारतीयाला नोकरीचं भय
श्रीमंताला चोरीचं भय
कुठे गेले ते निर्भयपण
प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षेत्रात भय
कशी यातून सुटका होईल?
मला वाटतं शहाणपणानं वागून
डोळे उघडे ठेवून जगण्यानं
पळून जाईल भय
पण प्रत्येकानं प्रामाणिकतेनं जगावं
दूसऱ्यालाही जगू द्यावं
मग याला घाबरून पळून जाईल भय
