भय
भय
1 min
350
निजले होते शांत मी
अधीन निद्रादेवीच्या
धरणी गंधाळलेली
गंधाने रातराणीच्या
निरव शांत ही राञ
होता निर्जन रस्ताही
साद घालत होते
कोण मज कळेणाही
किती मज वाटे भिती
शब्दही काही फुटेना
आईही जवळ नाही
रडू मज आवरेना
हाथ खांद्यावर माझ्या
थरथरले तनही
घामाने डबडबले
कपडे ओलेचिंबही
मागे वळून पाहले मी
नव्हते तेथे कोणीही
दूरवरील श्वेताकृतीने
शुद्धच माझी हरपली
उठून पाहते तर
आई उठवत होती
काय झाले रडायला
मला विचारत होती.
