STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

भय

भय

1 min
385

भय वाटेना अंधाराचे

ना भिती हिंस्र प्राण्यांची

चित्र कसे बदलले आजचे

भय मानवातल्या पशुंचे।। १।।


सत्तेचा हा सारीपाट

मांडला बहाद्दरांनी

खुर्ची साठी लढती सारे

शूर राजकारणी।। २।।


त्रस्त झाली जनता सारी

होई ससेहोलपट

म्हणण्यापुरते 'जनहित मे जारी'

कधी होईल कायापालट।। ३।।


आदर्श कसा घ्यावा

आजच्या समाजाने

सारे काही पाहती ते

उघडया डोळ्यने।। ४।।


माणुसकीला मारून इथे

माणूस पुढे जात आहे

या विचित्र प्रगतीचे

भय सा-यांना वाटत आहे।। ५।।


Rate this content
Log in