भूतकाळ आता पलीकडे
भूतकाळ आता पलीकडे
1 min
262
राहून जातो भूतकाळ पलीकडे..
सतत राहतो साथ वर्तमान इकडे..
झाल्या गेलेल्या चुकांचा आढावा देतो भूतकाळ..
चुका सुधारण्याची संधी देतो वर्तमानकाळ...
नवीन सुरुवात करावी अलीकडे...
म्हणावे भूतकाळ आता पलीकडे..
सुख दुःखांचा साक्षीदार असतो भूतकाळ..
एक सुंदर अनुभव देऊन जातो भूतकाळ..
आता शिकावे अनुभवातून ...
नवीन सुरुवात करावी हृदयातून..
वेध घ्यावा भविष्याचा ...
साकार करावा आनंद स्वप्नांचा .
सार्थक करावे जीवन सर्वांचे...
हेच उद्दीष्ट असावे जीवनाचे ..
